Thursday, August 13, 2009

वहितली कविता मी माझ्या ब्लॉगवर ताकली,

सर्वांनी वाचावी म्हणुन पत्रिके सारखी वाटली!

माझी कविता वाचून त्यावर भरपूर रिप्लाय यावेत,

कवितेत कमी पण रिप्लाय मधे शब्द जास्त असावेत!

माझी कविता वाचून यावी ओठांवर गाणी

bhaavuk शब्दांनी यावे डोळ्यात पाणी!

अशी असावी माझी कविता जी सांगुन जाइल खूप काही,

प्रत्येक जण आपली कविता त्यात पाही!

मग,

माझी ही कविता त्याने तिला फॉरवर्ड करावी,

आवडते ती त्याला ह्याची ती पावती असावी !

Thursday, August 6, 2009

नेहमी असेच होते,
बोलावेसे वाटते पण बोलू शकत नाही
काय करावे एकमेकंशिवाय करमत जे नाही!
निरभ्र आकाश त्यात लुक-लुकणारे तारे,
शब्दाविना माझ्या भावना तुला कळतिल का रे ?
उमलते फुल न चुकता कलितुन,
पाहतोय पुनवेचा चंद्र आज तुझ्या डोळ्यातुन

Saturday, July 4, 2009

कधी रुसवे कधी फुगवे ,
असे सुचले कवितेचे पाहिले कड़वे!
विचार जो करावा तशी कविता बनत नाही,
मी कवि आहे की फ़क्त चारोळी लिहितो हेच काळात नाही!
प्रेमावर कविता लिहावी की आयुष्यावर,
जमेल कविता छान प्रेमात कधी पडल्यावर!
नुसते यमक julavun तरी होती छान कविता,
एवढेच पुरे असते कवितेच्या विश्वात उडी मारन्या करीता!

Sunday, January 18, 2009

आकाशात तुटता तारा पाहिला विचार केला काय मागु आणि कोणासाठी?
मग
एक चंद्र मागितला आमवास्येच्या ता-यांसाठी,
शब्द मागितले विस्कटलेल्या कवितेसाठीa
आणि एक भाग्य मागितले स्वप्न पूर्ण करण्यासाठी!