ज़री असलिस तू घरी, तुझ्या स्पर्शला असतो मी वंचित,
लांबूनच पाहतो तुला , घेउन विचार कुशित!
दमून- भागून आलेलो मी, तुझ्या स्पर्शानेच तृप्त होतो,
पण आज तर तुझ्या विचारत, पाण्यावरच शांत होतो।
कधी वाटते तुझ्या रूपात अखंड बुडून जावे ,
तहानलेल्या पामराला, तुझ्या रूपाचे तीर्थ द्यावे!
भेटतेस सप्ताहांत कधीतरी, खरे सांगतो, आस तुझी असते वारो वारी!
शीत तुझे देह, मादक तूझे रुप, उन्हाळ्यात आठवते फक्त तूच आणि फक्त तूच !
